आगामी जि.प., पं.स.त भाजपाला
यश नाही -दिलीप वळसे पाटील
पुणे (रिपोर्टर) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपुर्ण बैठक दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे होत असून या बैठकी दरम्यान बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल करताना भाजपाकडून उपस्थित केले जाणारे वादग्रस्त मुद्दे हे केवळ अनेक बाबतीतले अपयश झाकण्याचा आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाला या मिळणार नसल्याचे म्हटले. सदरची बैठक ही कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका
जाणून घेण्यासाठी ठेवण्यात आली आहे.
या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची राजकीय भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षकार्यर्त्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्याचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांना त्यासंबंधी आवश्यक सूचना शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.
भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजपकडून उपस्थित केले जाणारे वादग्रस्त मुद्दे हे केवळ अनेक बाबतीतले अपयश झाकण्याचा आणि जनतेचं लक्ष झाकण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुंबईत अतिरिक्त सीपींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर ते कसे काम करतात यावर आमचं लक्ष असेल. वीज विभाजन माझ्या काळात झालं त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही खाजगीकरण करणार नाही. पण अदानी आणि सरकारचं काय सुरू आहे माहिती नाही. युनियन समजदार आहेत, उपमुख्यमंत्र्यांनी महावितरणचं खाजगीकरण होणार नाही असा शब्द दिला आहे त्यामुळे आता दिलेल्या शब्दावर ते किती ठाम राहतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याच्या दौर्यावर येणार आहेत. ज्याप्रमाणे राज्यातील काही उद्योग गुजरातला वळवण्यात आले त्याप्रमाणे आता उर्वरित उद्योग उत्तर प्रदेशात वळवण्याचा योगींचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, योगी आणि फडणवीस काहीही म्हटले तरी, उद्योगपतींना आपला उद्योग कुठे चालेल हे अचूक माहिती असतं. अमोल कोल्हे नाराज नसल्याचे सांगत दोन्ही जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2024 चा उमेदवार ठरवण्याचा अधिकार वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.