Friday, May 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाअंबाजोगाई, केजमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

अंबाजोगाई, केजमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर,
फिरणार्‍या नागरिकांना समज
सडकफिर्‍यांना सज्जड दम,
दोन्ही शहर कडकडीत बंद

अंबाजोगाई/केज (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अंबाजोगाई आणि केज शहरात आज विकेंड लॉकडाऊन अत्यंत कडेकोट ठेवण्यात आले. केजमध्ये तहसीलदारांसह प्रशासनातले अन्य अधिकारी रस्त्यावर उतरले तर अंबाजोगाई शहरात चौकाचौकात नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येऊन कडेकोट लॉकडाऊन पाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

बीड शहरासह अंबाजोगाई, केज, आष्टी या चार तालुक्यात सर्वात जास्त कोरोना बाधित आढळून येत आहेत. अंबाजोगाई आणि केज प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आज कठोर पावले उचलले. अंबाजोगाई शहरात कालपासूनच विकेंड लॉकडाऊनची जनजागृती करण्यात येत होती. आज प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी प्रशासन व्यवस्थेने कडेकोट केली. अंबाजोगाईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. शहरातल्या चौका चौकात, नाक्या नाक्यावर पोलीसांनी सडकफिर्‍यांना समज दिली. इकडे केज शहरात अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार दुलाजी मेडगे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी स्वत:हून रस्त्यावर उतरून फिरणार्‍या नागरिकांना समज देत काही सडकफिर्‍यांना दम दिला. त्यापुर्वी सकाळी पोलीसांचे पथसंचलन शिवाजी चौक, कानडी रोड, बसस्थानक, मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रोजा मोहल्ला या प्रमुख रस्त्यांवर करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!