तयारी अंतिम टप्प्यात शोभायात्रेने होणार
सुरुवात; विविध संत महंतांची उपस्थिती
बीड (रिपोर्टर) येथील श्रीमद् भागवत कथा संयोजन समितीच्या वतीने आणि विविध धार्मिक संस्थांच्या सहभागाने सद्गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अमोघ वानीतून 5 फेब्रुवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधी दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक अलौकिक सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे
बीडमध्ये राम कृष्ण लॉन्स मंगल कार्यालयातील वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न धोंडीराज शास्त्री महाराज पटांगणकार नगरी मध्ये या भागवत कथेच्या आयोजन करण्यात आले असून शुभारंभ प्रसंगी ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर, अमृता आश्रम महाराज, योगीराज गोसावी महाराज पैठण यांची उपस्थित राहणार असून समारोप करवीर पिठाचे शंकराचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सात दिवसात दरम्यान विविध संस्थांचे महाराज संत उपस्थित राहणार असून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे कथा स्थानी आरोग्य शिबीरही सात दिवस चालणार असून रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली असून शहरात आणि जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या कथेच्या श्रवणाचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे