Saturday, July 24, 2021
No menu items!
HomeUncategorizedमोबाईल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश, एलसीबीने तिघांना केले गजाआड

मोबाईल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश, एलसीबीने तिघांना केले गजाआड


दीड लाखाचा मुद्देमाल जप्त
बीड (रिपोर्टर):- मोबाईलवर बोलणार्‍यांचा मोबाईल पळवणार्‍या टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून एका अल्पवयीन मुलासह तिघांना गजाआड करत त्यांच्याकडून नऊ मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


गेल्या दीड महिन्यापासून बीड शहरात नगरपालिकेच्या आशीर्वादाने पथदिवे बंद आहेत. त्यामुळे भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच अंधाराचा फायदा घेऊन शहरातील तीन युवकांनी मोबाईल चोरण्याचा प्लॅन केला. जे लोक रस्त्यावर फोनवर बोलतात, त्यांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा प्लॅन या टोळीने आखला आणि शहरातून तब्बल नऊ जणांचे मोबाईल त्यांनी चोरले. याबाबत त्यात्या पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या तक्रारी नागरिकांनी दिल्या होत्या. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत असतानाच पीआय भारत राऊत यांना मोबाईल चोरणार्‍या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार काल रात्री पीएसआय दुल्लत यांनी नाळवंडी नाका येथे सापळा रचून तिघा जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरातून विविध ठिकाणाहून नऊ मोबाईल चोरल्याचे सांगितले यासाठी त्यांनी दुचाकी (क्र. एम.एच. २३ ए.झेड. ६७४३) वापरल्याची कबुली दिली पोलीसांनी रोहीत काळे (वय २०, रा. एकता नगर बार्शी नाका बीड), प्रवीण नाडे (वय २३, रा. नाळवंडी नाका, एकता नगर बीड) व तिसरा अल्पवयीन मुलगा (रा. एकता नगर) अशा तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगत दुल्लत, पो.हे.कॉ. सलीम शेख, नसीर, तांदळे, पो.ना. शिंदे, दुबाले, गायकवाड, सुरवसे, हराळे यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!