Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडसाळेगाव शिवारात महिलेचा निर्घृण खून

साळेगाव शिवारात महिलेचा निर्घृण खून

महिलेसोबत असलेला व्यक्तीही गंभीर जखमी; घटनास्थळी केज पोलीस दाखल
केज(रिपोर्टर): मोटारसायकलवर जाणार्‍या महिलेवर कोयत्याने वार करून तिचा निघृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साळेगाव शिवारात घडली. महिलेसोबत असलेला व्यक्तीही यात गंभीर जखमी झाला. महिलेचा खून करून अज्ञात मारेकरी फरार झाले. घटनास्थळी केज पोलीस आणि डीवायएसपी पथक दाखल झाले होते.


लोचना माणीक धायगुडे (वय ३२) रा.धायगुडा पिंपळा ही महिला मोटारसायकलवर जात होती. केज-साळेगाव रोडवर महिलेवर अज्ञात मारेकर्‍याने कोयत्याने हल्ला करून तिचा निघृणपणे खून केला. महिलेसोबत जो व्यक्ती होता तोही गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती पोलीसांना झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन, मिसळे, नामदास, भोले, वैभव राऊत, पप्पु अहंकारे, शेख जमीर हे घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेने केज तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!