कामाची चौकशी करण्याची मागणी
नेकनूर (रिपोर्टर) नेकनूर ग्रामपंचायतीच्या विकासासाठी 18 लाख रुपयांचा निधी आलेला होता. या निधीचा योग्य पद्धतीने उपयोग न करता त्यात अपहार करण्यात आला. सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासनाचा निधी लाटला आहे. कामाची चौकशी करून दोघांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेकनूरच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नेकनूर ग्रामपंचायत सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते. गावाच्या विकसाासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी येत असतो. सदरील या ग्रा.पं.ला 1 कोटी 18 लाख 35 हजार 293 रुपयांचा निधी आलेला होता. या निधीतून ओपन जीम, रस्ता, नाल्या, लाईट, कचरा कुंडी इत्यादी कामे करायचे होते, मात्र निधी नेमका खर्च झाला कुठे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. गावामध्ये काम कुठेही दिसत नसल्याने या पैशांवर सरपंच व ग्रामसेवक बहीरवाळ या दोघांनी डल्ला मारल्याचे दिसून येऊ लागले. गावातील सुविधेबाबत सरपंच, ग्रामसेवकांना कसल्याही प्रकारचे देणेघेणे नसल्यामुळेच या दोघांनी पैशाची वाट लावून टाकली आहे. या प्रकरणी दोघांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.