Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनागेवराईत कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी शिक्षकांचा पुढाकार

गेवराईत कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी शिक्षकांचा पुढाकार


आरोग्य विभागाला करणार मदत,
दहा लाख रूपयांचा करणार निधी जमा

गेवराई (रिपोर्टर) कोरोना काळामध्ये शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षकांना काम नाही फुकटचा पगार घेत असल्याची टीका सातत्याने शिक्षकावर केली जात आहे. दरम्यान या शिक्षकांची सामाजिक भान राखत कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक एकवटले असून कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर किंवा अंबुलन्स कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शिक्षक परिवार गेवराई या नावाने मदत देण्यासाठी शिक्षक निधी जमा करत असून मदत देऊ इच्छिणार्‍या शिक्षकांनी लवकरात लवकर सढळ हाताने मदत करावी असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले असून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


गेवराई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयातील सुविधा कमी पडत आहे. तसेच कोरोना काळामध्ये शाळा बंद आहेत. त्यामुळे शिक्षकांना काम नाही फुकटचा पगार घेत असल्याची टीका सातत्याने शिक्षकावर केली जात आहे. दरम्यान या शिक्षकांची सामाजिक भान राखत कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी आता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कोविड सहायता निधीच्या माध्यमातून निधी गोळा करीत आहेत. गेवराई तालुक्यातील शिक्षण विभागाची कर्मचारी आस्थापना एकूण १४२५ असून आजपर्यंत त्यापैकी ४२५ कर्मचारी या मदतनिधी यज्ञात सहभागी झाले असून, यांच्याकडून आतापर्यंत अंदाजे पाच लाख रूपयांच्या वर निधी जमा झाला असून गेवराई तालुक्यात विविध शिक्षक संघटनांनी जो सामाजिक बांधिलकी म्हणून उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजाप्रती आपली असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण समाजाला भरीव प्रकारची दहा लाख रुपयांपर्यंतची ऑक्सिजन व्हेंटिलेटर किंवा अंबुलन्स कोणत्या ना कोणत्या स्वरुपात शिक्षक परिवार गेवराई या नावाने मदत देणार असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त केले जात आहे. हा निधी जमा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी जितेंद्र भिमराव दहिफळे मो.क्र ८८८८२७०७७७, विष्णू निला आडे मो.क्र ९०११८७५९९९, सचिन सदाशिव दाभाडे मो.क्र ९४२०१०२३२९, तात्यासाहेब हरिभाऊ मेघारे, विकास भिकचंद घोडके ९७६७४८८९४५, कुटे दयावन नामदेव मो.क्र ८२७५३८९६८१, विष्णू सूर्यकांत खेत्रे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिक्षक मित्र परिवाराकडून करण्यात आले असून लवकरच या रकमेतून कोविड बाबत आवश्यक ती मदत करणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!