पदे न भरल्यास गावकरी आंदोलन छेडणार
पात्रूड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षकांअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील जि.प. शाळेवर शिक्षक कमी असल्याने याचा परिणाम शिक्षणावर होत असून वेळीच प्रशासनाने शिक्षकांचे पदे भरावेत, नसता गावकरी शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाची दुरावस्था आहे. शाळेमध्ये विविध सुविधा पुरविल्या जात नाहीत, शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. शिक्षकांसाठी गावकर्यांना आंदोलन करावे लागते. काही वेळा गावकरी जि.प. कार्यालयात शाळा भरवतात. माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची संख्या भरपूर असून शिक्षकांची संख्या कमी आहे त्यामुळे त्याचा परिणाम शिक्षणावर होऊ लागला आहे. वेळोवेळी मागणी करूनही शिक्षण विभाग शिक्षकांच्या रिक्त जागा भरत नाही. जि.प. प्रशासनाने रिक्त जागा संदर्भात दखल न घेतल्यास गावकरी आंदोलन छेडतील, असा इशारा गावकर्यांनी दिला आहे.
000