बारामतीच्या सौ.सुनंदाताई पवार असणार प्रमुख पाहुणे
बीड (रिपोर्टर):- गेल्या अठरा वर्षांपासून बीड शहरामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होत असून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या ही शिवजयंती कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता साजरी होते.
सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त/सचिव तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार या उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच विदेशी कलाकारासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचे ढोल पथक हे असणार आहे. यावर्षी माताभगिनी, युवती, ज्येष्ठ महिलाांना कार्यक्रमस्थळी बसण्याची विशेष व्यवस्था व सागर हाईटपासून स्काऊट भवन रोड, एचडीएफसी बँकच्या बाजुने महिलांकरीता एक विशेष गेट ठेवण्यात आले असून यातून फक्त महिलांनाच प्रवेश असणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने केले आहे.