Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना पाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस हात-पाय पसरवतोय ‘स्वाराती’त 22 रुग्ण, 14 रुग्णांवर यशस्वी...

कोरोना पाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस हात-पाय पसरवतोय ‘स्वाराती’त 22 रुग्ण, 14 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिय, आठवड्यात तिघांचा मृत्यू


जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता
बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या समुह संसर्गासह निमोनियासारख्या गंभीर आजाराने जिल्हा हवालदिल असतानाच बीडमध्ये म्युकरमायकोसिस नावाच्या आजाराने पाय पसरायला सुरुवात केली असून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे 22 रुग्ण उपचार घेत असून 14 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. चार जण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे तर आठवडाभरात म्युकरमायकोसिस या आजाराने तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजारही कोरोनाशी संलग्न असल्याचे सांगण्यात येते. आधीच निमोनियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. बीड जिल्ह्यात किमान 50 पेक्षा अधिक रुग्ण म्युकरमायकोसिसचे असू शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील जानकारांचे म्हणणे आहे.


कोरोनाच्या समुहसंसर्गाने जिल्ह्यात अक्षरश: हाहाकाल उडवून दिलाय. निमोनियासारखा गंभीर आजार रुग्णाला मृत्यूच्या दाढेत घेऊन जात आहे. समुहसंसर्ग आटोक्यात येत असताना मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. रोज अनेक रुग्णांचे मृत्यु होत असल्यामुळे जिल्हा भीतीच्या सावटाखाली असतानाच आता कोरोनामुळे होणारा म्युकरमायकोसिस हा आजारही बीड जिल्ह्यात पाय पसरत असल्याचे दिसू नयेत आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे तब्बल 22 रुग्ण उपचार घेत असून 14 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितले. चार रुग्णांवर शस्त्रक्रिया होणे बाकी असून आठवडाभरात म्युकरमायकोसिस या आजारामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचेही पुढे आले आहे. म्युकरमायकोसिस हा आजार बीडमध्ये पाय पसरवत असून बीडच्या जिल्हा रुग्णालयात हे रुग्ण फारसे आढळून आले नसले तरी खासगी रुग्णालयामध्ये मात्र म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल होत असल्याचे समोर येत आहे. बीडमधील डॉ. बारकुल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत अशा आठ रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अनिल बारकुल यांनी सांगितले.
‘म्युकर मायकोसिस’बद्दल डॉक्टरांचे मत
म्युकरमायकोसि याचीलागण झाल्याचे प्राथमिक लक्षणे नाकातून रक्त येणे, डोकेदुखी होणे, मेंदूजवळ गेल्यानंतर प्रचंड डोके दुखणे, डोळ्यांपर्यंत गेल्यावर डोळा जाण्याची शक्यता, हा बुरशीसारख्या प्रकारातला रोग म्हणावा लागेल. यावर उपचार – शस्त्रक्रिया नाही तर महागडे औषध आहे. कोरोनाशी संलग्न म्हणता येणार नाही परंतु कोरोनामुळे इम्युनिटी कमी होते आणि अशा लोकांना हा आजार होतो.
-डॉ. अनिल बारकुल

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!