रॅलीत मराठी, इंग्रजी, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्या कवायती आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, सीईओ अजित पवार, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत महाराजांना वंदन परळीत माजी मंत्री धनंजय मुंडेंची ‘जय जिजाऊ जय शिवराय’ची घोषणा जिल्ह्यातल्या गावागावात शिवजन्मोत्सव उत्साहात
बीड/परळी (रिपोर्टर) बहुजनप्रतिपालक, कुळवाडीभूषण श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असून आज बीड जिल्ह्यातल्या गावागावात जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणांनी आस्मंत दणदणाणून गेल्याचे दिसून आले.
आज सकाळी परळीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री आ. धनंजय मुंहे यांनी अभिवादन करून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा दिल्या. तर इकडे बीडमध्ये महाराजांच्या पुतळ्यासमोर हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी, दीपा मुधोळ-मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह आन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय वंदन करण्यात आले.
जिल्हाभरातल्या गावागावांतून ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणेने आस्मंत दणाणून गेल्याचे पहावयास मिळत होते. बीडमध्ये ‘तुम्ही आम्ही बीडकर’ यांच्या वतीने सर्वधर्मिय अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला. अठरापगड जातीतील मावळ्यांनी रॅलीला उपस्थितीत दर्शवून महाराजांचा जयजयकार केला. खासकरून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडलेल्या मराठी मुलुखाचा अभिमान-स्वाभिमान जागृत करणारे, सर्वास पोटाशी लावणे आहे असे म्हणत जात-पात-धर्म-पंथांना बाजुला ठेवत माणूस धर्माचा जयजयकार करत प्रत्येकाच्या उरात स्वाभिमान जागृत करणारे युगुपुरुष, बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. तिकडे शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराजांना वंदन करण्यात आले तर इकडे परळीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भल्यासकाळी परळीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भगवा ध्वज फडकवत अभिवादन केले. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या अठरापगड जातीतील मावळ्यांनी वंदन करून छत्रपतींचा जयघोष केला.
या वेळी आ. धनंजय मुंडेंनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’च्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आकर्षक फुलांनी व रोशनाईने सजावट करण्यात आली होती. परळीत जे चित्र होते तेच चित्र जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात पहायला मिळाले, गावागावात पहायला मिळाले. बीडमध्ये आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत महाराजांना शासकीय वंदन करण्यात आले.