निवेदन देऊनही काम चालू न केल्याने आज जिजामाता चौकात रस्तारोको
शिरूर कासार(रिपोर्टर): राखडलेल्या पैठण पंढरपूर पालखी मार्गासाठी वारकर्या सह ग्रामस्थ आक्रमक झाले असून काम तात्काळ सुरु करावे यासाठी 20 फेब्रुवारी रोजी रस्तारोको करण्याचा इशारा तहसीलदार यांना देऊन सुद्धा पालखी मार्गाचे काम सुरु न केल्याने आज 11वाजता जिजामाता चौक येथे रस्ता रोको करण्यात येऊन झत ठ या कंपनीचा धिक्कार असो अश्या घोषणा यावेळी वारकरी व ग्रामस्थांनी दिल्या. चालू काम गत अनेक वर्षांपासून रखडले असून सदरील काम जर लवकर पूर्ण करण्यात आले नाही तर राक्षभुवनसह ग्रामस्थ पाच वाड्यांसह शहरातील जिजामाता चौकात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसिलदार यांना गेल्या आठवड्यात निवेदन देऊन देण्यात आला होता.
शिरूर ते राक्षसभूवन या सहा किमी रस्त्याचे काम कंत्राटदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रखडले असून या भागातून रहदारी करणार्या वाहनचालकांचे किरकोळ स्वरुपाचे अपघात होत आहेत.रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.तांत्रिक कारण पुढे करून मनमानी पद्धतीने काम करणार्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या संबधित प्रशासनासह कंत्राटदाराला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत यासाठी आज 11 वाजता राक्षसभुवन ग्रामस्थ व वारकरी बीड पाथर्डी रस्त्यावरील जिजामाता चौकात शिरुरसह कोळवाडी, कान्होबाची वाडी, कारेगाव, विघनवाडी, कठाळवाडी, पिंपळ्याचीवाडी, जालन्याचीवाडी या गावातील नागरिकांना घेवून रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून बसले असून ग्रामस्थांनी त्या रस्त्याचे कंत्राट असणार्या झ त ठ कंपनीचा धिक्कार असल्याचे घोषणा देऊन रस्तारोको केला यावेळी प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार, अरुण भालेराव, दादासाहेब हरिदास, कल्याण तांबे, कैलास तांबे, किशोर खोले, पोपट कनुजे, जिजा खोले, कृष्णा गिरी, ज्ञानेश्वर गाडेकर, सुनील खोले, रमेश तांबे, संतोष सवासे, अक्षय जाधव, अनिल सवासे, दत्तात्रय तांबे, पांडुरंग खोले, बद्रीनाथ खोले, राम खोले आदी नागरिक सहभागी झाले होते.