बीड (रिपोर्टर) शेतकर्यांचे नेते गंगाभीषण तावरे यांच्याकडून कापूस हंगाम संपला तरी कापसाला भाव मिळत नसल्यामुळे आज होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कापूस पेटवून देत बोंब मारो आंदोलन केले.
नोव्हेंबर महिन्यामध्ये कापसाचा हंगाम सुरू झाला. सुरुवातीला कापसाला चांगला भाव होता. साडे नऊ हजाराचा भाव वाढून तो दहा ते बारा हजार होईल या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी आपल्या घरातच कापूस साठवला. काहींनी जिनिंगमध्ये अनामत टाकला. मात्र डिसेंबर महिन्यापासून कापसाचे भाऊ उतरायला सुरुवात झाली तो आज प्रतिक्विंटल साडेसात हजार रुपयांवर आला आहे. त्यामुळे कापसाच्या सुरुवातीच्या भावामध्ये ते आजच्या भावात प्रतिक्विंटल दोन हजाराचा तोटा सोसावा लागत आहे. यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हिरमुसला आहे. त्या पार्श्वभूमीवर कापसाचे भाव वाढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मध्यस्थी करावी आणि कापसाला मोठा भाव मिळावा यासाठी आज माजलगावात गंगाभीषण थावरे यांचनी कापसाची होळी करत बोंब मारो आंदोलन केले. या वेळी कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.