Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनामे महिना जिल्ह्यासाठी ‘मौत का सौदागर’ याच महिन्यात सर्वाधिक २८ हजार ८२०...

मे महिना जिल्ह्यासाठी ‘मौत का सौदागर’ याच महिन्यात सर्वाधिक २८ हजार ८२० रुग्ण

९८१ बाधितांचा कोरोनाने मृत्यू; मृत्यूदर २५ टक्क्याच्या पुढे
बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आटोक्यात असलेल्या बीड जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात मात्र कोरोनाने हाहाकार उडवून देत मृत्यूने अक्षरश: तांडव केल्याचे मे महिन्यातल्या २७ दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या २७ दिवसात तब्बल १ लाख १५ हजार ३५८ संशयितांची तपासणी केली असता यात ८६ हजार ५३८ निगेटिव्ह आढळून आले तर ५८ हजार ८२० कोरोना बाधीत आढळून आले. या सत्तावीस दिवसात बीड जिल्ह्यघात तब्बल ९८१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभाागच्या आकडेवारीवरून दिसून येत असल्याने बीड जिल्ह्यासाठी मे महिना मौत का सौदागर ठरला आहे. अद्यापही जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट असून आजही रोज ७०० च्या आसपास कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जनतेने आणखी काही दिवस शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करायलाच हवे. मे महिन्यातली ही आकडेवारी जिल्ह्याचा मसनवाटा कसा झाला हे दाखवून देते.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाला रोखण्यात बीड जिल्ह्याला प्रचंड यश आले होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट बीड जिल्ह्यासाठी त्सुनामी होत आली आणि या लाटेने अनेकांचे आरोग्य उद्ध्वस्त करत अनेकांच्या घरातले लोक हिरावून नेले. ३० एप्रिलची आकडेवारी आणि २७ मे ची आकडेवारी पाहिल्यानंतर बीड जिल्ह्यात कोरोना अक्षरश: या महिन्यात मौत का सौदागर ठरला आहे. ३० एप्रिलला ३ लाख ९० हजार १२२ रुग्णांच्या एकूण तपासण्या होत्या त्या आता ५ लाख ५ हजार ४८० वर जावून पोहचल्या. याचा अर्थ या २७ दिवसात १ लाख १५ हजार ३५८ संशयितांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये २८ हजार ८२० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ३० एप्रिलला जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांचा एकूण आकडा हा ९१४ होता तोच २६ मे रोजी जिल्ह्यात मृत्युचा आकडा हा १ हजार ८९५ झाला आहे. त्यामुळे गेल्या २७ दिवसांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात ९८१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवाी पाहिल्यानंतर गेल्या सत्तावीस दिवसांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात कोरोनाने जो हाहाकार उडवून दिला आणि मृत्यूचे तांडव केले त्या तांडवात अनेकांचे घरसंसार उद्ध्वस्त झाले तर अनेकांचे घर उघड्यावर आले. अद्यापही बीड जिल्हा हा रेडझोनमध्ये आहे. रोज सातशेच्या आसपास कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी कोरोनाला गांभीर्याने घेत शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. दुसरीकडे जिल्ह्यातील कोविड सेंटरमधून उपचार घेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या याच महिन्यात सर्वाधिक असून ३८ हजार ५५१ जणांनी कोरोनावर मात केली.


२५ मे २०२१ ची आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८२८३१
जिल्ह्यातील एकूण मृत्यू १८९५
जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १६.३८ टक्के
जिल्ह्याचा डेथ रेट (फॅटिलिटी रेट) २.२८ टक्के
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेपो प्रति रुग्ण १६.०६
कॉन्टॅक्ट ट्रेसड् १३३०५९१
रिकव्हरी रेट ९०.८० टक्के

एकूण कोरोना मुक्त ७५२१७

नमुना तपासणी माहिती
एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या ५०५४८०
निगेटिव्ह अहवाल ४२२६४९
पॉझिटिव्ह अहवाल ८२८३१

३० एप्रिल २०२१ ची आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५४०११
जिल्ह्यातील एकूण मृत्यू ९१४
जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १३.८४ टक्के
जिल्ह्याचा डेथ रेट (फॅटिलिटी रेट) १.६९ टक्के
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेपो प्रति रुग्ण १७.५२
कॉन्टॅक्ट ट्रेसड् ९४६३२६
रिकव्हरी रेट ८६.५८ टक्के

एकूण कोरोना मुक्त ४६७६६

नमुना तपासणी माहिती
एकूण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या ३९०१२२
निगेटिव्ह अहवाल ३३६१११
पॉझिटिव्ह अहवाल ५४०११

Most Popular

error: Content is protected !!