Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमपोहताना तलावात बुडून पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू

पोहताना तलावात बुडून पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू

अंबाजोगाई (रिपोर्टर):- काळवटी तलावात पोहत असताना एका पंधरा वर्षीय मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.
अंबाजोगाई शहरापासून जवळच असणार्‍या काळवटी तलावात पोहत असताना वैष्णवी वचिष्ट भोसले (वय १५) ही बुडाली. तिला जखमी अवस्थेत बाहेर काढून स्वाराती रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने अंबाजोगाई शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Most Popular

error: Content is protected !!