सासु, सासरा, नवर्यासह 7 जणांविरोधात पुण्यात विश्रांतवाडी पोलीसात गुन्हा दाखल; बीड तालुक्यातील सौंदाण्यात घडली घटना, पिढीतेला अनेकवेळा उघड्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यास भाग पाडले
बीड, (रिपोर्टर):- धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड तालुक्यातील सौंदाणा येथे विवाहितेच्या फिर्यादीनंतर उघडकीस आली असून गेले 3 वर्ष सदरील विवाहितेला सासरच्यांकडून प्रचंड त्रास दिला जायचा, एवढेच नव्हे तर अघोरी विद्यासाठी सदरील विवाहीतेस विर्वस्त्र करून तिचे हातपाय बांधत मासिक पाळीतले रक्त काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. 2022 च्या कालखंडात हा संतापजनक प्रकार घडला असून पुणे येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे हा घृणास्पद प्रकार महाराष्ट्रासमोर आला. पिढीत महिलेशी अगोदर विवाहीत असताना प्रेमविवाह केला जातो नंतर तिला नांदण्यासाठी त्रास दिला जातो ती बळजबरीने नांदण्यासाठी आली असता सासु-सासर्यासह अन्य लोक उघड्या बाथरूममध्ये अंघोळ करण्यास बळजबरी करत होते, अखेर हा त्रास तिला सहन न झाल्याने महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोलीसांचे दार ठोठावले अन् पुणे येथील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या खळबळजनक प्रकरणाचा गुन्हा 7 मार्च रोजी दाखल झाला.
एका 27 वर्षीय महिलेचा प्रेमविवाह बीड तालुक्यातील सौंदाणा येथील सागर बाबासाहेब ढवळे याच्यासोबत झालाह होता. सदरील हे दांम्पत्य काही दिवस कोल्हापुर येथे राहत असे, त्यानंतर ते पुणे येथे राहु लागले. या दोघांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून खटके उडु लागले. सागर याला पहिली एक पत्नी होती. ही बाब त्याने दुसर्या पत्नीशी लपवुन ठेवली. सदरील महिलेचा पती कामधंदा काही करत नसल्याने तिचे सासु,सासरे तिला नेहमी टोमणेही मारत असे. या वादावादीमुळे सागर ढवळे व त्याची पत्नी ऑगस्ट, सप्टेबर या दरम्यान सौंदाणा येथे राहण्यासाठी आले होते. याठिकाणी महिलेवर सासरच्या मंडळीकडून अन्याय,अत्याचार सुरूच होते. अघोरी विद्येसाठी मासिक पाळीचे रक्त हवे म्हणून दिर दिपक व मावस दिर विशाल तुपे, भाचा रोहन मिसळे, सासु आणि सासरा यांनी जबरदस्ती केली. या प्रकाराला पिढीतेने प्रचंड प्रमाणात विरोध केला, मात्र सदरील महिलेचे हातपाय बांधुन तिला निर्वस्त्र करून तिचे जबरदस्तीने रक्त काढुन घेण्यात आले. हा प्रकार प्रचंड संतापजनक आहे. पिढीतेचा पती बाहेर गावाहुन गावी आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार पतीला सांगितला, मात्र पतीने यावर पांघरून घालण्याचे काम केले. यानंतर ही महिला पुणे येथे आपल्या माहेरी गेली. त्याठिकाणी सासरच्या लोकांनी केलेल्या अन्यायाचा पाढा सामाजिक कार्यकर्त्या सिंधु चंद्रकांत शेलार, दिपाली दत्तात्रय पाटील यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पिढीतेने 7 मार्च रोजी पुणे येथील विश्रांतवाडी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी पती सागर बाबासाहेब ढवळे (वय 27 वर्षे), सासु अनिता बाबासाहेब ढवळे (वय-50 वर्ष), सासरा बाबासाहेब ढवळे (52 वर्ष), दिर दिपक बाबासाहेब ढवळे, मावसदिर विशाल शेषेराव तुपे (वय 25), भाचा रोहन मिसाळ (वय 21 वर्ष), महादु कथले (वय 60 वर्ष), रा. सर्व सौंदाना ता.बीड यांच्या विरोधात कलम 377, 354 (अ), 504, 323, (498 (अ) 34 भादवींनुसार गुन्ह्यासह महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादुटोणा, प्रतिबंध अधिनियम 2013 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सासर्याचे गैरकृत्य
पिढीत महिला जेव्हा सौंदाणा येथे रहात होती, तेव्हा तिचा सासरा तिच्याकडे वाईट नजरेने पहात होता. अंघोळीसाठी जाताना बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवण्यास भाग पाडले जात होते. विवाहीत महिलेस मुलबाळ होत नसल्याने तिचा जाणिवपुर्वक छळ केला जात असे, तिला मारहाण केली जात असे.
सासरच्यासह इतरांनीही केला तिच्यावर अन्याय
पिढीतेवर सासु, सासर्यासह मावस दिर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ आणि गावातील महादु कथले या तिघांनी देखील तिच्यावर अन्याय केला. या अघोरी कृत्यामध्ये सासरच्या लोकांना त्यांनी साथ दिली.
पिढीतेचा प्रेम विवाह
सागर ढवळे याने पिढीतेला अंधारात ठेवुन तिच्याशी विवाह केला. विशेष करून सागर ढवळे याचे या आधीही लग्न झाले होते, काही दिवसाने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सासरच्यानी सावरासावर करत त्यावर पांघरून घालण्याचे काम केले.