Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी तालुक्यात घटसर्पाची दहशत, आठवडाभरात शंभराच्या जवळपास लहान-मोठे जनावरे दगावले

आष्टी तालुक्यात घटसर्पाची दहशत, आठवडाभरात शंभराच्या जवळपास लहान-मोठे जनावरे दगावले

शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान
पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या गावाला भेटी
बाधित गावात पशुसंवर्धन विभागाचे
पथके तैनात करुन लसीकरण

आष्टी ( रिपोर्टर ) :- तालुक्यातील जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच ६ गावांच्या परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे ६ गावांतील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.मागिल काही दिवसांपासून या गावातील लहान मोठे १०० जनावरे दगावले आहेत. या घटनेने शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले,लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.या गावांना पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शुक्रवारी दि.२८ मे रोजी भेट देऊन पाहणी केली आ. सुरेश धस यांनी ही माहिती कळताच घटनास्थळी धाव घेत शेतक-यांना धिर दिला या बाधित गावातील जनावरांचे लसीकरण आष्टी पशुसंवर्धन विभागाने पथके तैनात करुन तात्काळ जलदगतीने काही गावांचे पूर्ण केले आहे.तर काही गावांमध्ये सुरू आहे.
तालुक्यातील शेतकरी शेती व्यावसायाला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करतात परंतु तवलवाडी,पांढरी,जामगांव,देविगव्हाण,वाळूंज,सोलेवाडी,या गावातील जनावरे मागिल ४ ते ५ दिवसांपासून मृत्यू पावत आहेत. या जनावरांना घटसर्प या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे.या घटनेने शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले लाखो रुपयांचे पोटच्या मुला प्रमाणे सांभाळलेली जनावरे डोळ्यासमोर मरु लागल्याने या गावातील पशुधन धोक्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर गावांना बीड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, डॉ. संतोष शामदीरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी तवलवाडी गावाला भेट देऊन, संबंधित शेतकर्‍यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.आ.सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेत शेतक-यांना धिर दिला
शेतक-यांनी जनावरांना स्वच्छ चारा,स्वच्छ पाणी पाजावे, मृत पावलेल्या जनावरांची विल्हेवाट खोल खड्डा खोदून चूना टाकून लावावी पशुसंवर्धन विभाग या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी घटनास्थळी स्थळ ठोकून आहे.तात्काळ पशुसंवर्धन विभाग आष्टीच्या वतीन पुणे येथून लस उपलब्ध केली असून लसीकरणासाठी बाधित गावांमध्ये पथके तैनात करुन लसीकरण करण्यात येत आहे.शेतक-यांनी घाबरून न जाता आपले पशुधन वाचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आष्टी तालुका पशुसवर्ंधन अधिकारी मंगेश ढेरे यांनी सांगितले. आ. सुरेश धस घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आष्टी तालुक्यातील तवलवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.या परिसरातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करतात अचानक घटसर्प या आजाराने जनावरे दगवू लागल्याने शेतक-यांचे होत्याचे नव्हते होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी तात्काळ तवलवाडीला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घटसर्प बाधित गावांमध्ये पथके तैनात
आज उद्या दोन दिवसांत होणार लसीकरण पूर्ण

घटसर्प आजारामुळे फुफ्फूसदाह होऊन जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण मोहीम हाती घेऊन वाळुंज,जामगांव,देविगव्हाण,तवलवाडी या परिसरात ४ डॉक्टरचे प्रत्येकी १ पथक तैनात करण्यात आले असून आज सकाळी ८ वाजेपासून लसीकरणास सुरवात झाली आहे.आज उद्या घटसर्प रोखण्यासाठी होत असलेले लसीकरण पूर्ण होणार आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!