Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडबोगस खालसा झालेल्या इनामी जमिनीचे फेरफार रद्द करण्याचे आदेश

बोगस खालसा झालेल्या इनामी जमिनीचे फेरफार रद्द करण्याचे आदेश


भू सुधार विभागातील महसूल सहाय्यक मंडलीक कार्यमुक्त; मुख्य सुत्रधाराचा शोध कोण घेणार? दै.रिपोर्टरच्या ग्राऊंड रिपोर्टींगचा दणका
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड इनाम जमीन व देवस्थानाची इनाम जमीन हजारो एक्कर आहे. संबंधित जमिनीचे इनामदार यांच्या नावाचे बॉंड दाखवून या जमिनी खालसा करण्याचा डाव गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या संदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत्या. परंतू प्रशासनाने या तक्रारीची दखल योग्य वेळी घेतली नसल्याने बोगस खालसा प्रकरण सुरूच होते. या संदर्भात दै.रिपोर्टरच्या ग्राऊंड रिपोर्टींगच्या माध्यमाने गेल्या दोन आठवड्यापासून सतत पाठपुरावा सुरू होता आणि या पाठपुराव्याला यश आले. बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी वृत्ताची दखल घेत बीड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना सक्त सूचना देण्यात आल्या की, २०१८ मधील व पुर्वीच्या अगोदरचे इनामी जमीन खालसा झाल्यानंतर जे फेरफार घेण्यात आलेले आहे ते फेरफार तात्काळ रद्द करून फेरफार रद्द झाल्याची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी यांना देण्याचे आदेश दि.२७ मे रोजी काढण्यात आले. हे आदेश निघताच बोगस खालसा झालेल्या बोगस मालकात घबराट पसरली असून आता पुढे सीबीआय चौकशीच्या सामोरे जावेच लागणार आहे. या प्रकरणात भू सुधार विभागातील महसूल सहाय्यक मंडलीक यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले असून मोठ्या माशाने छोटा मासा गिळला अशी चर्चा सुरू आहे.


बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात असलेल्या सारंगपुरा मस्जिद इनाम जमीन, गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील इनाम जमीन, खापरपांगरी येथील इनाम जमीन, पालवण येथील श्रीराम देवस्थान इनाम जमीन यासह जिल्ह्यातील इतर इनामी जमिनी खालसा करून वरिष्ठांच्या आदेशाने तहसीलदार यांना काही एक माहिती न देता थेट मंडळ अधिकार्‍यांच्या नावाने आदेश काढून बोगस खालसाद्वारे फेरफार करून सातबारा मालकी हक्काची नावे लावण्यात आल्याचे दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधी यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा केला. अनेक त्रुट्या आणि चुकीच्या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व बाबी प्रशासनाने अभ्यासपुर्ण माहिती घेवून थेट बीड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना पत्र देवून तलाठी मंडळ अधिकारी यांनी २०१८ व यापुर्वीच्या अगोदरचे इनामी जमीन बोगस आदेश आणून अधिकार अभिलेखामध्ये संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांनी नोंद घेतल्याची बाब खुद्द जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ भू सुधार उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांना पत्राद्वारे आदेश देवून तात्काळ वरील फेरफार रद्द करून घेण्याचे कळविले. या प्रकरणी सर्व तहसीलदार यांना पत्र व्यवहार करून फेरफार रद्द करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या असून आता मंडळ अधिकारी व तलाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे किती दिवसात पालन करून फेरफार रद्द करून जिल्हाधिकारी यांना माहिती देतील? याकडे दै.रिपोर्टर विशेष लक्ष देणार असून इनामी जमीन संदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
आदेशात स्पष्ट नमुद
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात असे स्पष्ट नमुद केले आहे की, माझ्या असे निदर्शनास आले आहे की श्री.एन.आर.शेळके बडतर्फ उपजिल्हाधिकारी व तत्सम अधिकारी यांचे सन २०१८ मधील व पुर्वीचे देवस्थान इनाम जमिनी बाबतचे बोगस आदेश आणून अधिकार अभिलेखामध्ये संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी नोंद घेत असल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर बाब ही गंभीर आहे. तरी याद्वारे आपणास आदेशीत करण्यात येते की, पुर्वीच्या आदेशाची नोंद सातबारा घेण्यापूर्वी या कार्यालयाची पुर्व परवानगी घेतल्याशिवाय अधिकार, अभिलेखामध्ये नोंद घेवू नये. मागील वर्षापासून देवस्थान इनामी जमिनीबाबतच्या आजपर्यंत अशा नोंदी घेतल्या असल्यास असे फेरफार उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ रद्द करावेत. तहसीलदार, मंडळअधिकारी व तलाठी यांनी अशी बाब उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून सदर फेरफाराचे पुर्नविलोकन करून रद्द करून घ्यावेत व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास पाठवावा. यात कसूर करणार्‍या तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या विरूद्ध गंभीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. उप जिल्हाधिकारी भू सुधार आघाव पाटील यांच्या सहीने हे आदेश पारीत करण्यात आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!