बीड (रिपोर्टर)ः-विधानसभेत शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थ संकल्प मांडतांना गृहमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थ संकल्प पंचा अमृतावर आधारलेला असल्याचे सांगत शाश्वत शेती, समृध्द शेतकरी, महिला आदिवासी, मागसवर्ग ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास, भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास, रोजगार हमीतून विकास, पर्यावरण पुरक विकास हे यातले पंच आमृत असून पहिले आमृत शेती विकासावर असल्याचे सांगत कांदा उत्पादकांना मदतीचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा करत केंद्राच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपयात अजुन सहा हजार रुपयाची भर घालेल. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांनी प्रतिवर्षी बारा हजार रुपये मिळतील अशी घोषणा देेंवेद्र फडणवीसांनी यावेळी केली.
शिंदे-फडणवीसांचा पहिला अर्थ संकल्प मांडतांना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 2 वाजता बोलायला सुरूवात केली. सर्वप्रथम त्यांनी जगतगुरू संत तुकारामांच्या चरणी साष्टांग दंडवत घालत अर्थसंकल्प मांडायला सुरू केले. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, मुंबई, अमरावती, नाशीक, छत्रपती संभाजी नगर, नागपूर याठिकाणी उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जिवनगाथा प्रदर्शीत करण्यात येईल. त्यासाठी 250 कोटीचा निधी योजीला असून किल्याच्या संवर्धनासाठी 300 कोटीचा निधी देण्यात आला आहे. भारताच्या पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत एक ट्रिलीयनचा वाटा हा महाराष्ट्राचा असावा असा आमचा मानस असून निती आयोगाच्या धर्तीवर मित्र ही संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शिंदे फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प हा पंच अमृतावर आधारलेला असून पाच ध्येयावरील आधारीत पंचामृत सांगतांना शाश्वत शेती, समृध्द शेतकरी, महिला आदिवासी, मागसवर्ग ओबीसीसह सर्व घटकांना सर्वसमावेशक विकास, भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत विकास, रोजगार हमीतून विकास, पर्यावरण पुरक विकास यावर आधारलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेत आणखी सहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता बारा हजार रुपये मिळणार आहे. त्याचा लाभ 1 लाख 15 हजार शेतकर्यांना होणार आहे. त्यासाठी 6 हजार 900 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. 2016 च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकर्यांच्या हिस्याचा विमा हप्ता राज्य सरकार भरेल. शेतकर्यांना फक्त 1 रुपय भरुन पोर्टलवर भरुन नोंदणी करावी लागेल. वार्षीक तिन हजार कोटीची यात तरतुद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरीत पात्र शेतकर्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे सांगून मागेल त्याला शेततळे यानंतर मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरीतगृह, मागेल त्याला आधुनीक पेरणी यंत्र असे घटक उपलब्ध करुन दिले जातील. यासाठी 1 हजार कोटीची तरतुद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुगृह योजना यात अपघात शेतकर्यांच्या कुटूंबीयांना दोन लाखापर्यंत सानुगृह अनुदान, आगामी तिन वर्षात 25 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली आणली जाणार असल्याचे सांगून पंचनाम्यासह आधुनीक तंत्रज्ञान वापरला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडत आहे. वेळे अभावी पुर्ण अर्थ संकल्प देता आला नाही.