किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे गारपीटीने फळबागांची व रब्बी पिकांची झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शासनाने मदत जाहिर .करावी या मागणीसाठी आज आंबेवडगाव येथे सकाळी ठिक 10 वाजता .गावातील शेतकर्यांनी मिरच्या टमाटे डाळिंब भाजीपाला रस्त्यावर टाकून संताप व्यक्त केला तरी शासनाने गारपीट झालेल्या व पिकांची नुकसान झालेल्या भागांची तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे 17 व 18 मार्च रोजी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाने तत्परता दाखवत होणारे शेतकर्याचे नुकसान पाहून या अवकाळी पावसाची व गारपीटीची दखल घेऊन तात्काळ शेतकर्यांना अनुदान द्यावे यासाठी आज हायवे रोडवर सकाळी गावातील शेतकर्यांनी रोडवर मिरच्या डालिंब आंबे फळे भाजीपाला टाकून आपला रोस व संताप व्यक्त याची दखल नाही घेतली तर रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा हि देण्यात आला आहे. यावेळी बोंबा मारून ही आंदोलन करण्यात आले या आंदोलनात गावातील तरुण कर्यकर्ते उमेश घोळवे सरपंच .उत्तरेश्वर घोळवे रामधन घोळवे .राज घोळवे अर्जुन रुद्रे महादेव वाघमोडे सिद्धाराम थोरात शहाजी कदम रामा घोळवे विमल शेभाजी गोरे रमेश नायकोडे शेष नारायण नायकोडे पुसाराम नायकोडे रामनाथ नायकोड बडूद घोळवे सत्या प्रेम घोळवे . सुशेन घोळवे अदि ग्रामस्य हाजार होते .