Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडधारूरसमाज मंदिर शेजारील अतिक्रमण हटवण्यासाठी धारूर पंचायत समिती समोर उपोषण

समाज मंदिर शेजारील अतिक्रमण हटवण्यासाठी धारूर पंचायत समिती समोर उपोषण

किल्ले धारूर( रिपोर्टर) धारुर तालुक्यातील रुई धारूर येथील समाज मंदिर शेजारील अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.


धारूर तालुक्यातील रुई धारूर येथील समाज मंदिर शेजारी काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे या अतिक्रमण केलेल्या व्यक्तींना ग्रामसेवक यांनी संबंधित शासनाच्या जागेच्या पीटीआर देखील दिलेल्या आहे याकामी ग्रामसेवक यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून अतिक्रमणधारकांना पीटीआर दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे वारंवार ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला लेखी तक्रार देऊन देखील कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढले नसल्याने आज धारूर पंचायत समिती समोर मोतीराम गायकवाड भिका गायकवाड लक्ष्मण गायकवाड शिवाजी गायकवाड यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत अतिक्रमण काढले जाणार नाही तसेच बोगस पीटीआर देणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे

Most Popular

error: Content is protected !!