गेवराई, (रिपोर्टर):- गेवराई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळु उपसा होत आहे. या वाळु माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या अधिकारी, कर्मचार्यांना धक्काबुक्की करत वाळुने भरलेला टॅम्पो पळवुन नेल्याची घटना तालुक्यातील आगार नांदुर फाटा येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील आगारनांदुर शिवारात वाळु उपसा करून त्याची वाहतुक होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी बाबासाहेब बाजीराव बडे यांना मिळाली होती. त्यांनी आपला फौजफाटा घेवुन काल रात्री 9 वाजता आगार नांदुर येथे छापा टाकला असता यावेळी शाहरूख सय्यद रा. नागझरी यांनी मंडळ अधिकारी यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली व वाळुने भरलेला टॅम्पो पळवुन नेला. याप्रकरणी गेवराई पोलीसात कलम 353, 341, 379, 143, 148, 504,506, 188 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.