Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत चढ-उतार आज 180 बाधीत; 2064 रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत चढ-उतार आज 180 बाधीत; 2064 रुग्णांवर उपचार सुरू


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्याला कडक लॉकडाऊनमधून मुभा दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. आज आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल 180 वर गेला आहे. हळूहळू पुन्हा जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. नसता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.


आरोग्य विभागाने काल दिवसभर 2939 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यामध्ये 180 बाधित आढळून आले आहेत. बाधितांमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह केज तालुक्यातील असून ते 48 आहेत. त्या पाठोपाठ आष्टी 37, बीड 24, गेवराई 17, पाटोदा 19, अंबाजोगाई 5, धारूर 3, शिरूर 10, माजलगाव 7 आणि परळी तालुक्यात 3 रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत बीड जिल्ह्यात 2064 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत होते.

Most Popular

error: Content is protected !!