Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रसहकारी बँकेत संचालक हवा पदवीधर ! रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित नियमाने खळबळ

सहकारी बँकेत संचालक हवा पदवीधर ! रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित नियमाने खळबळ


सहकारमधल्या मातब्बर संचालकांना घरी बसावे लागणार
रिझर्व्ह बँक सहकारी बँकावरील संचालक मंडळामध्ये निम्मे संचालक हे विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण करणारे असावेत, असा नियम लागू करण्याच्या तयारीत असल्याने सहकारी बँकींग क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. हा नियम लागू केल्यास बँकेचा संचालक किमान पदवीधर किंवा त्यापेक्षा अधिकची पात्रता धारण करणारा आवश्यक असणार आहे. या निर्णयामुळे सहकारी बँकांवरील निम्म्यापेक्षा अधिक आणि दिग्गज संचालकांना घरी बसावे लागेल.
गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी बँकांच्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून नवनवीन नियम लागू केले जात आहेत.

तसेच काही मार्गदर्शक तत्वेदेखील सहकारी बँकांवर लावली जात आहेत. बँक रेग्युलेशन अ‍ॅक्टमध्ये केंद्र सरकारने 2020 मध्ये सुधारणा केल्यानंतर रिझर्व्ह बँकेला मिळालेल्या अधिकारात कलम 10 अंतर्गत विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण करणारे 50 टक्के संचालक, संचालक मंडळात असावेत अशी तरतूद निवडणूक कायद्यामध्ये करता येऊ शकते. रिझर्व्ह बँकेकडून तशा हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एकूणच नव्या सुधारणांचा सहकारी बँकावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी नऊ मंत्र्यांची मंत्री समिती गठीत केली आहे. रिझर्व्ह बँकेला अधिकार असणार्‍या कायदेशीर तरतुदी, तसेच संचालक मंडळासंदर्भात लागू करावयाचे नियम यासंदर्भात राज्य नागरी बँक फेडरेशनच्या अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी मंत्री समितीपुढे नुकतेच सादरीकरण केले आहे. राज्य सरकारची मंत्री समिती यासंदर्भात कोणती पावले उचलायची, याचा निर्णय घेणार आहे.
राज्यात 2 लाख 25 हजार सहकारी संस्था आहेत. किमान निम्मे संचालक विशिष्ट शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावीत. हा नियम लागू केल्यास राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक यांमधील मातब्बर संचालकांची सद्दी संपणार आहे. वर्षानुवर्षे सहकारात काम करून संचालक राहिलेल्या अनेकांना या नियमामुळे बँकेतून पायउतार व्हावे लागले. देशातपलीि; प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये सहकारी बँकाचे जाळे आहे. सहकाराला 110 वर्षांचा इतिहास आहे , असे असताना रिझर्व्ह बँकेकडून सहकाराकडे वक्रदृष्टी केली जात असल्याने सहकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, गेल्या काही वर्षांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाच्या विरोधात सहकाराला लढा द्यावा लागत आहे

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!