बीड (रिपोर्टर)ः-जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गतआरोग्य अधिकार्यांची बैठक दि. 21 मार्च रोजी आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला बहुतांश आरोग्य अधिकारी गैरहजर राहीले. जे अधिकारी उपस्थित नव्हते. त्या अधिकार्यांना जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी नोटीसा बजावल्या आहे. दोन दिवसाच्या आत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 21 मार्च रोजी जिल्हयातील सर्वच आरोग्य विभागाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला बीड,केज येथील अधिकारी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.साबळे हे ही बैठकीला उपस्थित होते. इतर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी बैठकीला हजर नव्हते. ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. बैठकीला नसणार्या अधिकार्यांना जिल्हाधिकार्यांनी नोटीस बजावली. गैरहजरीबाबत प्रत्यक्ष दोन दिवसाच्या आत भेटावे व हजर का राहीला नाहीत याबाबतचा खुलासा करावा असे निर्देश देण्यात आले आहे. या निर्णयामुळे बैठकीला हजर न राहणार्या अधिकार्यांच्या चांगलेच धाबे दणाणले आहे.