Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली

आज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली


बीड तालुक्यात १४ तर आष्टीत ५९ पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज चढउतार होत आहे. काल आलेल्या अहवालात १०८ रुग्ण आढळून आले होते तर आज त्यामध्ये पुन्हा वाढ झाली असून १५४ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज आरोग्य विभागाला २२१७ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.


गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी आढळून येऊ लागल्याने जिल्हावासियांना लॉकडाऊनमधून ढिल देण्यात आली आहे. सध्या रुग्णांची संख्या रोज कमी जास्त होत आहे. आज आलेल्या अहवालात जिल्ह्यात १५४ जण पॉझिटिव्ह तर २०६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्हमध्ये सर्वात कमी परळीत तालुक्यात असून सर्वात जास्त रुग्ण आष्टी तालुक्यात आहेत. त्यामध्ये बीड १४, आष्टी ५९, अंबाजोगाई ९, गेवराई ११, केज १२, पाटोदा २, शिरूर २०, वडवणी ७, माजलगाव ४, परळी १ आणि धारूर तालुक्यात ५ रुग्ण आढळून आले आहेत. कालपर्यंत बीड जिल्ह्यात एकूण १७५१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!