Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन

छत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन


माजलगाव (रिपोर्टर):-तालुक्यातील छत्रबोरगाव येथील दलित वस्ती मागील दोन महिण्यांपासून अंधारात असुन अभियंता मिसाळ व लाईनमन दराडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.


छत्रबोरगाव येथील दलित वस्तीलमध्ये गेल्या दोन हिण्यांपासुन विज नाही. याबाबत वेळोवेळी निवेदन दिले असता अभियंता मिसाळ व लाईनमन दराडे यांनी जाणिवपूर्वक लाईटचा डिपी बोरगावमध्ये बसवला नाही. त्यामुळे वस्तीमधील रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे या दोन जणांवर शिस्त भंगाची कारवाई करावी आणि दलित वस्तीमध्ये तात्काळ विजपुरवठा सुरळीत करावा यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष भिमराव कदम, बाबा टाकणखार यांचेसह वस्तीमधील रहिवाशी सहभागी झाले होते.

Most Popular

error: Content is protected !!