बीड (रिपोर्टर) शाळांमध्ये आरटीईच्या माध्यमातून मोफत प्रवेश दिला जातो. बीड जिल्ह्यात यावर्षी 225 शाळा अॅडमीशनसाठी सज्ज आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सात हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतात. यावर्षी 225 शाळांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळतील. या शाळात 1 हजार 827 जांगावर प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी 7 हजार 742 इतके अर्ज आले आहेत. एकूण जागेच्या चौपट अर्ज आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
आरटीई प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ही पुणे येथून होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे ही प्रक्रिया होत आहे. 25 मार्च रोजी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.
त्यानंतर लॉटरी पद्धतीने पुणे येथे सोडत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत तसेच कागदपत्र तपसणी साठी तालुका निहाय गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पडताळनी समित्या गटित करण्यात येणार आहेत. तेव्हा पालकांना शाळेमध्ये प्रवेश वेळी होणार्या नाहक त्रासा पासून सुटका मिळणार आहे. पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएस येईल.तरी देखील पालकांनी एसएमएस अवलंबून न रहता आपल्या पाल्याची मोफत प्रवेशासाठी निवड झाली की नाही याची पडताळणी करावी असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
अशी झाली नोंदणी
1) ’आरटीई’ साठी नोंदणी केलेल्या शाळांची संख्या- 225
2) प्रवेशासाठी उपलब्ध जागा- 1 हजार 827
3) विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल संख्या- 7 हजार 742
तालुके आरटीई पत्र प्रवेशाच्या दाखल झालेले
शाळांची संख्या जागा अर्ज
अंबाजोगाई 35 214 1189
आष्टी 14 46 159
बीड 17 169 1878
धारूर 07 107 229
गेवराई 36 285 1186
केज 21 229 607
माजलगाव 29 147 884
परळी 27 262 1171
पाटोदा 04 15 109
शिरूर 09 115 213
बीड शहर 19 258 84
वडवनी 07 46 133
एकूण. 225 1827 7742
शाळा पैसे मागत असतील तर तक्रार द्या – मनोज जाधव
मोफत प्रवेश घेतल्यानंतर शाळा कपडे, वही/पुस्तके, दप्तर, बुट , बस भडे याची रक्कम अकारू शकतात मात्र या व्यतिरिक्त कसलीही फी घेण्याची शाळांना परवानगी नाही. जर शाळा विविध कारणांनी पैसे घेत असतील तर पालकांनी आधी गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी , मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही शाळां विरोधात लेखी तक्रार करावी असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.