Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू...

मराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे

पुणे (रिपोर्टर):- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. आधी राज्य सरकारनेही निर्णय घ्यावा, विधानसभेत एक बोलता, बाहेर एक बोलता, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करा, कळू एकदा महाराष्ट्राला, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी मी केंेद्राचं बघतो म्हणत नुसती झुलवाझुलवी करायची हे आता जमणार नाही. इतरांप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळालच पाहिजे.


सुप्रिम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण गरम झाले आहे. मराठे आक्रमक दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आज खा. संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यात पुण्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी माध्यमासमोर येऊन बैठक घेतली. माहिती दिली. छत्रपती संभाजी राजेंनी मराठा आरक्षणावर आंदोलनाची हाक दिल्यानंतर पुण्यातली दोन राजघराण्यातली ही पहिली बैठक. आम्ही दोघे एकाच घराण्यातले आहोत. दोन घराण्यांचा संबंध नाही. संभाजी राजे यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे, असं म्हणत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान या वेळी त्यांनी देशाची पुन्हा फाळणी करायची की नाही याचा विचार करावा, असे सांगताना आजचे राज्यकर्ते यासाठी प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मी राज्याबद्दल बोलत असून हे सर्व केंद्राला पण लागू होतं. प्रत्येक राज्याला लागू होतं, असंही ते म्हणाले. उदयनराजे एवढ्यावर थांबले नाही तर मराठा आरक्षणप्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलवा आणि त्याचे थेट प्रक्षेपण करा, असं म्हणत उदयनराजे यांनी विधानसभेत एक बोलता आणि बाहेर एक बोलता असं आता जमणार नाही. तुम्ही इथलं बघा, केंद्राचं काय ते मी बघतो, असं म्हणत मराठ्यांना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी भूमिका संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांनी घेतली.
अजित पवारांनी घेतली

अजित पवारांनी घेतली
कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट
भाजपवर नाराज असलेल्या आणि थेट प्रदेशाध्यक्षांना बेदखल करत नाराजी व्यक्त करणार्‍या खासदार संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी कोल्हापुरातील न्यू पॅलेस गाठल्याची चर्चा आहे. तेथे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. ही भेट मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतली असली तरी याला पदर मात्र संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची असल्याचे कळते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!