एक कॉल अन् बीड पोलिस दलात खळबळ
ससेवाडीत नेमक काय घडल?
बीड । रिपोर्टर
‘सेसेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत बाँब आहे’. ’काही वेळातच धकामा होईल’ अनओळखी नंबरवरुन 112 वर आलेल्या कॉलने बीड पोलिस दलात एकच खळबळ उडली. बीड सह नेकनुर पोलिस ससेवाडीत डेरेदाखल झाले. ही घटना (दि. 27 मार्च रोजी आज सकाळी 11.30 ते 12 च्या दरम्यान घडली.
112 नंबर अनओळखी व्यक्तीने कॉल करुन ‘ससेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेत बाँब असून त्याचा काही वेळात धमाका होणार आहे’. येवढे बोलून फोन कट केला. त्यानंतर याची माहिती बीड पोलिसांसह नेकनुर पोलिसांना मिळाली. नेकनुर पोलिस ठाण्याचे प्रमुख मुस्तफा शेख यांनी तत्काळ आपल्या पथकासह ससेवाडीत धाव घेतली. शॉन पथकासह, बाँब नाशक पथकालाही पाचारन केले. जिल्हा परिषद शाळेचा सर्व परिसर शॉन पथकाने पिंजून काढल्यानंतर शाळेसह परिसरात कुठेच बाँब नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावकर्यांसह पोलिसांनीही सुटकेचा श्साव सोडला. फोन कोणी केला त्याचा पोलिस शोध घेत असतांना तो नंबर बंद हेाता. त्यांनतर काही वेळातच पोलिसांनी फोन करणार्याचा शोध घेतला असता एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने हा फेक कॉल केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
सकाळी 112 नंबरवर कॉल आल्याने आम्ही ससेवाडीत गेलो होतोत. मात्र तेथे संशयास्पद काहीही आढळून आले नाही. हा फेक कॉल होता. त्याचा आम्ही शोध घेतला असून फेक कॉल करणारा 10 ते 12 वर्षाचा मुलगा आहे. त्याला समज देवून नातेवाईकांना नोटीस दिली आहे.
मुस्तफा शेख
ठाणेप्रमुख नेकनुर,