बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीने दहन दफन भूमीवर अकरा कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली असून या निधीतून बीड जिल्ह्यातील 229 गावात दहन दफन भूमी, शेड, रस्ता आदी कामे होणार आहेत.
यावर्षी जिल्हा नियोजन विभागातून जनसुविधा योजनेला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून पालकमंत्री अतुल सावे यांनी हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे. या निधीतून बीड जिल्ह्यातील 229 गावांतील दहन दफन भूमीला मंजुरी देण्यात येणार आहे. या निधीतून दहन दफनभूमीचे शेड, दफनभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता, लाईट आदींची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे 229 गावातील स्मशानभूमीसह दहन दफनभूमीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पावसाळ्यात मयतावर अंत्यसंस्कार करणे सोपे जाणार आहे.