Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeक्राईमदहा हजाराची लाच घेताना पुरवठा निरीक्षक पकडला तहसीलमधील लाचखोर अधिकार्‍यात खळबळ

दहा हजाराची लाच घेताना पुरवठा निरीक्षक पकडला तहसीलमधील लाचखोर अधिकार्‍यात खळबळ


बीड (रिपोर्टर):- बहुबदनाम आणि बहुचर्चित असलेल्या बीड तहसीलमधील पुरवठा विभागातील लाचखोरी पुन्हा आज समोर आली, रेशन दुकानदाराविरोधात आलेल्या तक्रारीवर कारवाई करू नये, यासाठी पुरवठा निरीक्षकाने संबंधित रेशन दुकानदारास तब्बल दहा हजाराची लाच मागत पैसे दिले नाही तर दुकानाचा परवाना रद्द करेल, अशी तंबी दिली. लाचखोर अधिकार्‍याने मोठे तोंड वासल्यामुळे संबंधित रेशन दुकानदाराने थेट लाचलूचपत कार्यालय गाठले आणि तेथून आज सकाळी तहसील परिसरात लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. पुरवठा निरीक्षक स्वत:च्या कार्यालयामध्ये संबंधित दुकानदाराकडून दहा हजाराची लाच घेताना एसीबीच्या अधिकार्‍याने रंगेहात जेरबंद केले. सदरील लाचखोर पुरवठा अधिकारी रविंद्र सुभाष ठाणगे विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई आज दुपारी झाली.
महसूल आणि पोलीस दलात मोठ्या प्रमाणात लाचखोरी वाढली आहे. कालच बीड शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील अधिकारी लाच मागत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आज बीड येथील तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रविंद्र सुभाष ठाणगे यांनी एका रेशन दुकानदाराला दहा हजाराची लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यानुसार आज तहसील कार्यालयात डिवायएसपी हानपुडे यांनी सापळा लावला असता तो संबंधित रेशन दुकानदाराकडून दहा हजाराची लाच स्विकारतांना त्यांच्या गळाला लागला. त्याला ताब्यात घेवून त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडेसह त्यांच्या टीममध्ये पीआय परदेशी, अमोल बागलाने आदींनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!