आष्टी – आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.विजांच्या कडक-डाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले अवकाळी पावसाने तालुक्याला पुन्हा तडाखा दिला आहे.सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकर्यांसह दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान ग्रस्तांना धिर दिला आ.बाबासाहेब आजबे यांनी आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची बांदावर जाऊन रविवार दिनांक 9 एप्रिल रोजी पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, मंडळ कृषी अधिकारी शिदोरे साहेब यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. (वय -60) हे मयत शेतकर्यांचे नाव आहे.त्यामुळे आष्टीत आवकाळी पावसाने शेतक-यांचा बळी घेतला आहे. विजेच्या कडकडाटात व जोराचा पाऊस सुरू झाल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशाला बसले असता शेतकर्यांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला तर दोन शेळ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती सुरुडीचे माजी सरपंच तथा दूध संघ व्हा.चेअरमन अशोक गर्जे यांनी दिली असता तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.गर्जे कुटुंबातील कर्ता पुरुषाचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाल्याने सुरुडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.कारखेल बु.येथील शाळेवरील व घरावरील आलेला वादळी वार्यासह पावसामुळे पत्रे उडून गेले..नशीब बलवत्तर होते म्हणून कोणालाही इजा झाली नाही. कागदपत्राची उनमात्र खूप वाताहात झाली. काही कागदपत्र उडून गेले तर काही पावसाने भिजून चिंब झाली आहेत. संतोष भणगे सर व ग्रामस्थांच्या मदतीने त्या खोलीतील साहित्य दुस-या खोलीत हलवले आहे. पडत्या पावसात ग्रामस्थांनी केलेले सहकार्य खूप मनाला भावले. संतोष भणगे सर म्हणाले मी शिक्षक म्हणून माझे तर कर्तव्य होतेच परंतू ग्रामस्थांची शाळेप्रती अस्था मनाला उभारी देणारी होती.पत्रे छतापासून 200 ते 250 फुट मानवी वसाहतीत पडले. एक महीला सुदैवाने वाचली अशी माहिती मा.सरपंच संजय जाधव यांनी दिली.शेतक-यांचे ही अतोनात नुकसान झाले असून आ.बाळासाहेब आजबे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे नुकसान ग्रस्त भागाची शेरी,कडा केरळ धामणगाव सुरुडी या गावात जाऊन पाहणी करत आहेत.