तात्काळ पंचनाम्याची जिल्हाधिकार्याकडे मागणी
आष्टी/ पाटोदा (रिपोर्टर)शनिवार दि.15 एप्रिल रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस हा गारपिटासह झाल्यामुळे शेतकर्यांना फार मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असुन आज सकाळी आमदार सुरेश आण्णा धस,युवा नेते जयदत्त भैय्या धस सह त्यांचे सर्व कुटुंबीय हे स्वतः आज दिनांक 16/4/2023 शनिवार रोजी सकाळीच शेतकर्यांच्या बांधावर शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली असून शेतकर्यांना त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून धीर दिला असुन आष्टी तालुक्यातील अरणविहीरा, तागडखेल,बांदखेल, वेलतूरी, देवळाली,घाटा पिंपरी गौखेल, पिंपळगाव घाट,केळ,मराठवाडी, हारेवाडी, देऊळगाव घाट,चिंचेवाडी इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादळी वार्यासह गारांचा पाऊस झालेला आहे अनेक शेतकर्यांच्या कांदा, मका, टरबूज, डाळींब, लिंबु, संत्रा व फळबाग इत्यादीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदार यांना आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी श्रीमती दीपाताई मुधोळ मुंडे यांच्या कडे केली आहे. शनिवार दि.15 एप्रिल रोजी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस हा गारपिटीसह झाल्यामुळे शेतकर्यांना फार मोठ्या नुकसान नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.आष्टी तालुक्यातील दौलावडगांव सह अरणविहिरा,पिंपळगाव घाट,देऊळगाव घाट,मराठवाडी या परिसरामध्ये जनावरांना चारा असलेला मका आणि कडवळ या पिकांसह अनेक ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या अवकाळीच्या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. अरणविहीरा येथे दोन फूट उंचीच्या गारांचा थर झालेला आढळून आला आहे.शेतकर्यांनी उन्हाळी कांदा या पिकासाठी बियाणे म्हणून राखून ठेवलेला कांदा देखील या गारपीटीमध्ये नुकसानग्रस्त झालेला आहे.या संपूर्ण परिसरातील गावांमधील व आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यात जिथे जिथे या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत याबाबत आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी श्रीमती दीपाताई मुधोळ मुंडे यांचेकडे मागणी करून सर्व संबंधित तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.
तात्काळ पंचनामे करून आवश्यक तेथे आर्थिक मदत पाठवा – आ. आजबे
अतिवृष्टी व गारांचा पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या पिकाचा सुपडासाफ झाला आहे.घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या गारपीटीचे पंचनामे सुरू झाले असून महसूल प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे आ.बाळासाहेब आजबे यांनी करुन आपत्ती ग्रस्तांना धीर दिला या भागाचे दोन दिवसात पंचनामे करून आवश्यक तिथे तात्काळ मदत पाठवण्याच्या सूचना आमदार बाळासाहेब आजबे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.