नगर पालिकेने वाहतूकीला अडथळा ठरणारे बॅनर काढावे
बीड(रिपोर्टर) बीड शहरातील अनेक भागामध्ये कटआऊट रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण तर होतच आहे. मात्र त्यात अपघाताचे प्रमाण वाढू लागले. बशीरगंज मधील चौकातील बॅनरमुळे मोटार सायकली एकमेकांवर धडकू लागले. या बॅनरमुळे वाहनधारकांना समोरचं वाहन दिसत नसल्याने अपघात होवू लागले. बॅनर लावणार्यांनी बॅनर लावतांना विचार करूनच बॅनर लावले पाहीजे. बीड न.प.ने बशीरगंज सह इतर भागातील बॅनर काढावे अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
वाढदिवसाचे बॅनर अनेक जण लावत असतात. काही बॅनर वाहतूकीला अडथळा ठरतात. तर काही बॅनरमुळे अपघात होत आहे. बशीरगंज भागातील चौकामधील बॅनर अपघाताला निमत्रंण देत आहे. दोन्ही बाजूने बॅनर असल्याने वाहन धारकांना समोरचं वाहन दिसत नाही. आज सकाळी तिन ते चार मोटार सायकली एकमेकांवर धडकल्या. बॅनर लावताना आपल्या बॅनरमुळे अपघात होणार नाही किंवा वाहतूकीला अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी बॅनर लावावे. नगर पालिकेनेही अपघाताला निमंत्रण ठरणारे बॅनर काढावे अशी मागणी वाहन धारकांमधून केली जात आहे.