
चाकरवाडीत सांगता सोहळ्यात भक्तांची महागर्दी
चाकरवाडीच्या सांगता सोहळ्यात महाप्रसादाचा मान परळीकरांना
धनंजय मुंडेंनी घेतले माऊली महाराजांच्या समाधीचे दर्शन
म्हणाले, महापंगतीत महाप्रसादाचा मान परळीकरांना दिला, आभार
ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाला महागर्दी

श्रीक्षेत्र चाकरवाडी (रिपोर्टर): 21 व्या शतकातले संत शिरोमणी वै. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त चाकरवाडी या श्रीक्षेत्री गेल्या सात दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह आणि महाशिवपुराण कथा सुरू आहे. आज या सप्ताहाची समाप्ती असून सकाळी काल्याचे किर्तन ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर यांच्या वाणीतून झाले. ते म्हणाले, माऊली महाराज वारकरी संप्रदायाचे उच्चकोटीचे महात्मे. माऊली महाराजांच्या श्रीहरी भक्तीचे तुम्ही-आम्ही पाईक आहोत. काल्याच्या कीर्तनाला लाखोंच्या उपस्थितीत भक्तांचा मेळा पहावयास मिळाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याच्या अंतिम दिवसाची महापंगतीचा महाप्रसाद देण्याचा मान हा परळीकरांना आयोजकांच्या वतीने देण्यात आला. त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर शिवमहापुराण कथेचे वाचन प्रदीपजी मिश्रा व ह.भ.प. महादेव महाराज यांचे दर्शन मुंडे यांनी या वेळी घेतले. कथेला दुपारी एक वाजता सुरुवात झाली आहे. लाखोंच्या संख्येने भक्तगण चाकरवाडीत डेरेदाखल आहेत.

संतशिरोमणी वै. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त आयोजीत अखंड हरिनाम सप्ताह तसेच शिवमहापुराण कथेचा आज सांगता सोहळा चाकरवाडीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडत आहे. लाखोंच्या उपस्थितीत भक्तगण चाकरवाडीत डेरेदाखल असून सांगता सोहळ्यात या सप्ताहाचे काल्याचे कीर्तन ह.भ.प. संदीपान महाराज हसेगावकर यांच्या वाणीतून झाले. या वेळी महाराजांनी ‘गोड लागे परी सांगताची नये, बैसे मिठी सये आवडीची वेधले ओ येणे श्रीरंग रंगे, मी माझी अंगे हरवली’ ही गवळण घेत हसेगावकर महाराजांनी त्याचे विवेचन करताना माऊली महाराज वारकरी संप्रदायाचे उच्चकोटीचे महात्म्ये होते, हे सांगताना माऊली महाराजांचे कार्य, त्यांचे संदेश उपस्थित भक्तांना सांगितले. काल्याच्या कीर्तनाचे महत्व आणि ईश्वरप्राप्ती कुठे आणि कसे मिळते हे सांगितले. दुपारच्या सत्रात शिवमहापुराणाचे वाचन प्रदीपजी मिश्रा यांची कथा सुरू होती. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे चाकरवाडीमध्ये डेरेदाखल आहेत. त्यांनी सर्वप्रथम माऊली महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी कथास्थळी येत ह.भ.प. महादेव महाराज आणि महाशिवपुराण कथा वाचक प्रदीपजी मिश्रा यांचे दर्शन घेतले. आज या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याची महापंगत ही परळीकरांची असून सोहळ्याच्या अंतिम दिवशी महापंगतीला महाप्रसाद देण्याचा मान आयोजकांनी आपल्याला दिला, याबद्दल धनंजय मुंडे यांनी आभार मानले.







