दिंद्रुड (रिपोर्टर):- पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रामध्ये दलितावर अन्याय व अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असून नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव व काल लातूर जिल्ह्यात गिरीधारी तपघाले यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील आंबेडकरी संघटनांनी आक्रमक होत दिंद्रुड पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील तरुण अक्षय भालेराव व लातूर जिल्ह्यातील गिरिधारी तपघाले यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली असून सदरील दोन्ही प्रकरणे फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अक्षय भालेराव हत्या प्रकरणांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा नांदेड जिल्हाध्यक्षाला सह आरोपी करण्यात यावे,अशा स्वरूपाच्या मागणीची निवेदन पोलीस स्टेशनच्या मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये दिंद्रुड व परिसरातील वंचित बहुजन आघाडी,भीम आर्मी, बहुजन विकास मोर्चा,डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया,रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया व अनेक आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनिल डोंगरे,विलास शिंदे, सिद्धार्थ मांयदळे,नवनाथ कांबळे, सुनील वावळकर यांनी आपल्या भाषणामध्ये सदरील घटनांचा निषेध व्यक्त केला.