Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआ. धस यांच्या मागणीला यश ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजारांची मदत

आ. धस यांच्या मागणीला यश ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजारांची मदत


बीड (रिपोर्टर)- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यक्रम, यात्रा मोहत्सव,जागरण गोंधळ, मोठे लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमास बंदी असल्याने गोंधळी समाज,शाहीर, हलगी संभळ, तुतारी, सनई वादक लावणी कलावंत अशा कलेवर पोट असणार्‍या सर्व कलावंत मंडळीवर लॉक डाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती.
त्यामुळे आमदार सुरेश आण्णा धस यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात कलावंतांची राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे अथवा मानधन सुरू करावे यासासाठी मागणी केली होती. काल मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित विभागाचे मंत्री व सचिव यांच्या उपस्थितीत २८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे त्याबद्दल राज्यभरातील कलावंत मंडळींकडून आमदार धस यांचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!