बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणार्या टोळीच्या मागावर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांनी या चोरट्यांचा शोध लावत तब्बल आठ घरफोड्या उघडकीस आणले आहेत. दोन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात त्यांना यश आले आहे.
अंबाजोगाई शहरात आठ ठिकाणी घरफोड्या झाल्याचे गुन्हे शहर पोलिसात दाखल होते. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने करत दोघांच्या मुसक्या बांधल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपींचे अझहर अब्दुल रहेमान पठाण व जिवन प्रभाकर साळुंके असे नाव आहेत. या दोघांना पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी आपले साथीदार अविनाश शंकर देवकर (रा. वडारवाडा), राहुल प्रल्हाद बनसोडे (रा. मुकुंदराज कॉलनी, अंबाजोगाई) यांच्या मदतीने मागील सात महिन्यात जोगाईवाडी शिवार, साकुड रोड, भीमाई नगर, राजीव गांदी चौक, खडकपुरा, सह्याद्री नगर, आरखनगर, मोरेवाडी, भगवानबाबा चौक, अंबाजोगाई या ठिकाणी चोर्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. हे चोरटे रात्री बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून गरात ठेवलेले दागिने, रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरून नेत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अझहर अब्दुल रहेमान पठाण (रा. पेन्शनपुरा, अंबाजोगाई), जिवन प्रभाकर साळुंके (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई, अविनाश शंकर देवकर (रा. वडावाडा ता. अंबाजोगाई), राहुल प्रल्हाद बनसाडे (रा. मुकुंदराज कॉलनी, अंबाजोगाई) यांनी केलेले गुन्हे निष्पन्न केले. पोलिसांनी अझहर पठाण व जिवन साळुंके यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप व टिव्ह असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरील आरोपी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पो.उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पो.हवालदार रामदास तांदळे, मारुती कांबळे, रामकृष्ण जायभाये, देवीदास जमदाडे, सुशिला हजारे, राजू पठाण, अर्जुन कांबळे, विक्की सुरवसे, अतुल हराळे यांनी केली.