जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची तहसील कार्यालयाला अचानक भेट
रेकॉर्ड रुमचे कुलूप तोडून पाहणी
बीड (रिपोर्टर): जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी आज अचानकपणे तहसील कार्यालयाला भेट दिली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कर्मचारी बेसावध होते. फोन करूनही त्यांना येण्यास लागत असलेला उशीर लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी रेकॉर्ड रुमचे कुलूप तोडून त्यातील रेकॉर्डची पाहणी केली. अस्ताव्यस्त पडलेले रेकॉर्ड बघून नाराजी व्यक्त करत अभिलेखे व्यवस्थीत ठेवण्याच्या सूचना तहसीलदार डोके यांना देऊन कालबाह्य रेकॉर्ड यांची यादी करत ते नष्ट करण्याचे या वेळी त्यांनी तहसीलदारांना सांगितले.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे कर्मचारी बेसावध होते. अचानकपणे सकाळी बाराच्या दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवला. रेकॉर्ड रुम बघितले तर त्याला कुलूप होते. संबंधित तहसीलदारांना फोन करूनही त्यांना व
त्यांच्या कर्मचार्याना येण्यास होणारा उशीर लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी साबेतच्या कर्मचार्याला कुलूप तोडण्यास सांगितले. कुलूप तोडून अस्ताव्यस्त पडलेले रेकॉर्ड बघून त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे सर्व रेकॉर्ड व्यवस्थीत लावण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदार डोके आणि त्यांच्या कर्मचार्याला दिल्या. तर त्याच रेकॉर्डमधील कालबाह्य झालेल्या रेकॉर्डची अद्यावत यादी तयार करून त्या नष्ट करण्याच्या सूचनाही दिल्या. तत्कालीन प्रभारी तहसीलदार आदित्य जीवने यांनी तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट एका अभियंत्याकडून करून घेतले होते. या अभियंत्याने ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल तहसील प्रशासनास दिला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी या इमारतीला आज भेट दिली. रेकॉर्ड रुम सोबतच या इमारतीमध्ये एकूण किती कार्यालयांचे कामकाज चालते याचीही माहिती घेऊनत यांची पर्यायी व्यवस्था काय करता येईल याची माहितीही तहसीलदार डोके यांच्याकडून घेतली.