Monday, January 24, 2022
No menu items!
Homeक्राईमसेना उपजिल्हाप्रमुख जगताप हल्ल्या प्रकरणी मुख्य आरोपी बाळासाहेब गुंजाळ अटकेत

सेना उपजिल्हाप्रमुख जगताप हल्ल्या प्रकरणी मुख्य आरोपी बाळासाहेब गुंजाळ अटकेत


बीड (रिपोर्टर)- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. प्रथमदर्शी या प्रकरणात राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तपासानंतर जगताप यांच्यावर शिवसेनेच्याच एका गटाकडून हल्ला झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात अशी मागणी होत होती. तब्बल 22 दिवसानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यास येडशी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. सदरची कारवाई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. गुंजाळ हे सध्या शिवसेनेत आहेत.


30 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. या हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. प्रथमदर्शी सदरचा हल्ला हा राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचे आरोप झाले. मात्र पोलिसांच्या तपासाअंती हल्ला हा शिवसेनेच्याच एका गटाकडून झाल्याचे उघड झाले. गेल्या 15 दिवसांपूर्वी या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आले. मात्र त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार होता. हनुमान जगताप यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात येत असताना यातील मुख्य आरोपी तथा नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ हा उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील एका हॉटेलवर जेवणासाठी आल्याची माहिती बीडच्या गुन्हे अन्वेषण विभागाला झाली. त्यानंतर रात्री पोलिसांनी हॉटेल परिसरात सापळा रचून बाळासाहेब गुंजाळ यास अटक केली. सदरील कारवाई स्था.गु.शा.चे पीएसआय भगतसिंग दुल्लत, खेडकर मेजर, मुन्ना वाघ, विकास वाघमारे, शिंदे, सोमनाथ गायकवाड यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!