शनिवारी दुपारी बस चालू करण्याची नागरिकातून मागणी
दिंद्रुड (रिपोर्टर): दिंद्रुड येथे शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या शाळकरी मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास नेमकं याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न उपस्थित राहू लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे दिंद्रुड येथील शैक्षणिक दर्जा चांगला असल्यामुळे खेड्यापाड्यातील चार ते पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दिंद्रुड येथे येतात परंतु शनिवारी दुपारपर्यंतच शाळा असल्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना वापस घराकडे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे,कारण माजलगाव आगाराच्या बस ह्या पाच वाजेच्या नंतर असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना असे ऑटोच्या टपावर बसून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यासोबत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माजलगाव आगर प्रमुख यांनी शनिवारी दुपारच्या बस चालू कराव्यात अशी मागणी आता खेडेपाड्यातील नागरिकांतुन होत आहे.