बलात्कार्यांचा सारथी प्रियकर, बलात्कारानंतर सात्रापोत्र्यात पिडितेस मारहाण; मारहाणीत प्रियकराची पत्नीही सहभागी; पिडितेला नग्न केल्याची माहिती, जखमी पिडिता दोन दिवसांपासून रुग्णालयात, आरोपींच्या शोधासाठी
दोन पथके रवाना, संतापजनक घटनेने बीड हादरले
बीड (रिपोर्टर): बीड शहराच्या चंपावती नगर येथून एका विधवेस उचलून स्कॉर्पिओमध्ये टाकत तिला बार्शीनाका मार्गे मांजरसुंबा ते सात्रापोत्रा इथपर्यंत घेऊन जाताना दोन नराधमांनी स्कॉर्पिओ गाडीच्या आतमधील सिटवर चालत्या गाडीत आळीपाळीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. सात्रापोत्रा येथे संबंधीत पिडितेस नग्न करून मारहाणही केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या मारहाणीत जखमी झाल्यानंतर संबंधित पिडितेस बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्बल 24 तासानंतर रात्री उशिरा या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर संबंधित महिलेच्या जवाबाने तीन जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना झाल्याचे सांगण्यात येते. या घटनेबाबत पोलसांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही मात्र संबंधित घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे.
या खळबळजनक आणि सनसनी निर्माण करून सोडणार्या घटनेची अधिक माहिती अशी, बीड शहरातल्या रेणु हॉस्पिटलसमोर असलेल्या चंपावती नगरमध्ये एक विधवा महिला राहते. तिच्या नवर्याचा कोरोनामध्ये मृत्यू झालेला आहे. संबंधित महिला ही 25 वर्षीय असून तिचे एक व्यक्तीसोबत संबंध होते. मात्र परवा दि. 4 ऑगस्टच्या सायंकाळच्या दरम्यान सदरची महिला ही आपल्या घराकडे जात असताना स्कॉर्पिओमध्ये तिचा प्रियकर व अन्य दोघे तिच्या जवळ आले. तिला उचलून गाडीत टाकले. बार्शी नाका मार्गे स्कॉर्पिओ सुसाट मांजरसुंब्यावर पोहचली. त्यावेळी गाडीतील लांबटे व होळंबे नावाच्या दोन नराधमांनी तिला दाबदडप आणि मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याहेतू झटापट सुरू केली. त्यातील एकाने तिचे हात धरून गाडीमध्येच तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसर्याने त्याच पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला. तोपर्यंत गाडी ही सात्रापोत्रा येथे पोहचली होती. याठिकाणी संबंधित पिडितेचा प्रियकर त्याच्या पत्नीसह राहतो, प्रियकराच्या घरासमोर गाडी पोहचताच प्रियकराच्या पत्नीने पिडितेस अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करत (त्या भाषेचा वापर फिर्यादीत असल्याचे समजते) मारहाण केली. सुत्रांच्या माहितीनुसार त्या पिडितेस प्रियकर, बलात्कार करणारे व प्रियकराच्या पत्नीने नग्न करून मारहाण केल्याचेही सांगितले जाते. मारहाण केल्यानंतर संबंधित पिडितेस सात्रापोत्रा या ठिकाणीच सोडून देण्यात आले. याबाबतची माहिती नेकनूर पोलिसांना समजल्याचे सांगण्यात येते. नेकनूर पोलिसांनी संबंधित महिलेस बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये 4 ऑगस्टच्या रात्रीच उपचारासाठी दाखल केले. अशीही माहिती समोर येत आहे. तब्बल चोवीस तासानंतर घटनेचे गांभीर्य पाहून शिवाजीनगर पोलिसांनी त्या महिलेचा काल ायंकाळी जवाब घेतला आणि प्रियकरासह बलात्कार करणारे होळंबे आणि लांबटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमध्ये विधवेवर सामूहिक बलात्कार तोही चालत्या गाडीमध्ये झाल्याची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून आरोपी व गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉपिर्र्ओच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहेत. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाकडे देण्यात आला आहे. सदरच्या घटनेची माहिती देण्याबाबत पोलिसांनी अत्यं गुप्तता पाळली. मात्र घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
इन्स्टाग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शिरूर (रिपोर्टर) : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पुण्याला पळवून नेत तिच्यावर बलात्कार करणार्या तरुणाविरोधात शिरूर पोलिसात कलम 376 सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करत न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
या घटनेची माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील एका गावातल्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवर पुणे जवळील शिरूर येथील तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. संबंधित तरुण हा गेल्या पंधरवाड्यात बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आला आणि मुलीला घेऊन पळून गेला. या प्रकरणाची तक्रार 23 जुलै रोजी शिरूर पोलिसात मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. अखेर काल मुलीसह मुलगा शिरूर पोलिसांना मिळून आला. या 12 ते 13 दिवसांच्या कालखंडात संबंधित तरुणाने औरंगाबाद, नगर, पुणे याठिकाणी त्या मुलीवर सातत्याने बलात्कार केला. म्हणून मुलीच्या जवाबावरून 376 सह पोस्कोअंतर्गत संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला शिरूर न्यायालया हजर केले. तेव्हा चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास आष्टी येथील पिंक पथकप्रमुख धरणीधर कोळेकर हे करत आहेत.