आडस (रिपोर्टर): व्हॉटस्अॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने आडसमध्ये दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील जमावाला पांगवले. ‘
त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून दोन गटातील लोकांवर गुन्हे दाखल होऊन 16 जणांना ताब्यात घेण्यात आले. सदरची घटना ही रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक असे की, ‘जिसकी बराबरी कर नही सकते, उसको बदनाम किया जाता है’ अशा आशयाची टिपणी करत वादग्रस्त फोटो व्हॉटस्अॅपच्या स्टेटसवर एका तरुणाने ठेवला. तेव्हा त्या तरुणास काही तरुणांनी ताब्यात घेऊन आडसच्या चौकामध्ये त्याला मारहाण केली. त्यामुळे रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गट आमने-सामने आले. या घटनेची माहिती धारूर पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळावर धारूर पोलिस पोहचली. जमावाला शांत करत दोन्ही गटातील जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. या घटनेनंतर सरकारी पक्षातर्फे पो.हे.कॉ. प्रशांत मस्के यांच्या फिर्यादीवरूएन दोन्ही गटातल्या लोकांवर गुन्हा दाखल करून यातील 16 जणांना ताब्यात घेण्यात आले.