रोहयोची कामे कधी सुरू होणार?
फळबागांसह विहिरीचे मस्टर काढण्याची मागणी
बीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे केली जातात. सध्या मराठवाड्यात पावसाची उघडीप आहे तरीही विहिरीचे मस्टर बंद करण्यात आलेले आहे. चांगला पाऊस पडेपर्यंत विहिरींचे मस्टर काढण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जाऊ लागलीय. तसेच फळबागांचे मस्टर गेल्या एक वर्षापासून बंद आहे, तेही सुरू करावे, अशी मागणीही होऊ लागली आहे.
रोहयो योजनेअंतर्गत शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो. दरवर्षी विहिर, शेततलाव, फळबाग, गायगोठा यासह विविध कामांचे मस्टर काढले जातात. सध्या पावसाची उघडीप आहे तरीही विहिरींचे मस्टर बंद करण्यात आले. पाऊस चांगला पडेपर्यंत विहिरींचे मस्टर काढण्यात यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जाऊ लागलीय. तसेच फळबागांचे मस्टर एक वर्षापासून बंद आहे ते मस्टर सुरू करावेत, जेणेकरून मजुरांनाही काम मिळेल व शेतकर्यांना त्याचा लाभ होईल.