बीड(रिपोर्टर): नवीन विज कनेक्शन घेण्यासाठी विज वितरण कंपनीकडून सतत विलंब केला जात असे, मात्र विज वितरण कंपनीने आता तात्काळ विजेचे कनेक्शन देण्याची मोहिम हाती घेतली. चार महिन्यामध्ये बीड जिल्ह्यातील 6 हजार 711 ग्राहकांना नवीन कनेक्शन देण्यात आले आहे.
विजेचे नवीन कनेक्शन मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर अनेक महिने कनेक्शन मिळत नसे, त्यामुळे ग्राहक त्रस्त होत असे. विज वितरण कंपनीने आपल्या कामामध्ये बदल केला असून लवकर कनेक्शन देण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील 6 हजार 711 ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन देण्यात आले आहे. दरम्यान या प्रक्रियेमुळे ग्राहकांना आता जास्त दिवस विजेचे कनेक्शन देण्यासाठी ताटकळत थांबावे लागणार नाही. इतर जिल्ह्यातही कनेक्शन देण्याची जोरदार प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मराठवाड्यात 60 हजार विजेचे कनेक्शन जोडण्यात आले आहे.