बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेय. शेतकर्यांसह छोटे-मोठे व्यवसायिक व मजुर विविध कारणाने आत्महत्या करू लागले आहे. शहरातील बार्शी नाका येथील एका 55 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य दोन ठिकाणीही आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत.
‘मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत. शेतकर्यांसह इतर छोटेमोठे व्यवसायिक आणि महिला आत्महत्या करू लागले आहे. बार्शी नाका येथील अरुण त्रिंबकराव सुरवसे (वय 55 वर्षे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसरी घटना खालापुरी येथे घडली. आशा ऊर्फ अश्विनी गणेश भस्मारे (वय 28 वर्षे) या महिलेने फाशी घेतली. तर तिसरी घटना मौज येथे घडली. सुशांतराव खांडेकर (वय 45 वर्षे) या व्यक्तीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. गेल्या बारा तासांमध्ये या तीन आत्महत्येच्या घटना घडल्या. या तिघांनी कुठल्या कारणावरून आत्महत्या केल्या हे मात्र समजू शकले नाही.