Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगांधी जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने

गांधी जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने


जमीनीच्या मावेजासाठी उखंड्याच्या शेतकर्‍यांचे धरणे मुस्लीम आरक्षणासाठी सत्याग्रह आंदोलन, दोषींविरोधात गुन्हे दाखल करा महिलेचे उपोषण
बीड (रिपोर्टर)ः- पाटोदा तालुक्यातील उखंडा येथील शेतकर्‍यांची जमीन डोंबरी तलावासाठी संपादीत करण्यात आली. या जमीनीचा वाढीव मावेजा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे देण्यात यावा या मागणीसाठी शेतकर्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. तर मुस्लीम आरक्षणासाठी लोकसेना संघटनेच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.


पाली येथील एका महिलेचेही आंदोलन सुरू आहे.
डोंबरीच्या तलावासाठी उखंडा येथील काही शेतकर्‍यांची जमीन संपादीत करण्यात आली. या जमीनीचा वाढीव मावेजा न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मिळावा यासाठी बाबू ठोसर, रामभाऊ ठोसर, बाळू ठोसर, शिवाजी लोखंड, भगवान लोखंडे हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामसमोर आंदोलन करत आहे. दुसरे आंदोलन लोकसेना संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. मुस्लीमांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे, उर्दु बालवड्यांना अंगणवाडीत रुपांतरीत करण्यात यावे, राज्यात एमपीएससी, युपीएससी अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे, मौलाना आझाद आर्थीक विकास महामंडळाचे बजेट मध्ये वाढ करुन थेट कर्ज योजना सुरू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी इलियास ईनामदार सह आदिंची उपस्थिती होती. बीड तालुक्यातील पाली येथील तारामती साळुंके ही महिला उपोषण करत आहे. मयत कुंडलीक साळुंके यांच्या मृत्यु प्रकरणी शिवाजी नगर पोलीसांनी तपास जलद गतीने करुन आरोपी यांना तात्काळ निलंबीत करुन अटक करण्यात यावी अशी मागणी महिलेच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाच्या जाचाळा कंटाळून अर्जुन साळुंके यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी महिलेची आहे.

Most Popular

error: Content is protected !!