नोटा काढून घेतल्या आणि चिल्लर ठेवली
बीड (रिपोर्टर): तीन दिवसांपूर्वी कालिकादेवी मंदिरामध्ये चोरीची घटना घडली होती. चोरट्याने दानपेटी पळविली होती. या पेटीत तीस ते पस्तीस हजारांपेक्षा जास्तीचे पैसे होते. ही पेटी पोलिसांना चर्हाटा फाटा परिसरातील एका शेतात आढळून आली. पेटीमध्ये फक्त चिल्लर आहे, नोटा मात्र चोरट्यांनी काढून घेतल्या आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कालिकानगर येथील कालिका देवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणात चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झालेला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सदरील ही दानपेटी चर्हाटा फाटा लगत असणार्या एका शेतामध्ये आढळून (पान 7 वर)
आली. ही पेटी फोडण्यात आली असून त्यात फक्त चिल्लर आढळून आली, नोटा मात्र चोरट्याने काढून घेतल्या आहेत. या पेटीत 30 ते 35 हजार रुपये असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.