Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबुधवारी 22 पॉझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा अडीचशेच्या घरात

बुधवारी 22 पॉझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा अडीचशेच्या घरात


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे असून बुधवारी जिल्ह्यात 22 जण कोरोना र्पाझिटिव्ह आढळून आले तर जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्याही कमी झाली असून ती अडीचशेच्या आत आहे.
आरोग्य विभागाला बुधवारी 1 हजार 976 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले.

त्यामध्ये 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर 1 हजार 954 जणांचा अहवाल निगेटिव्ह आढळून आला आहे. बाधितांमध्ये अंबाजोगाई 1, आष्टी 6, बीड 4, गेवराई 4, माजलगाव 3, पाटोदा 2 आणि वडवणी तालुक्यातही दोन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असून आता उपचाराखालील रुग्णांची संख्याही अडीचशेच्या घरात आली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात एकूण 1 लाख 2 हजार 866 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 2 हजार 774 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!